दरवर्षी केली जाते मातीपासून बनविलेली इकोफ्रेंडली गणपती मूर्ती..
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो,आणि आजपासूनच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे रशियन महिला गेल्या २८ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पर्यावरण पूर्वक फक्त मातीच्या गणपतीची मूर्ती बनवून त्याची प्रतिस्थापना करत गणेशोत्सव साजरा करत आहेत.. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांच्या एकतेचे हे एक प्रतीक आहे.भाद्रपद शुध्द चतुर्थीला सर्वत्र गणेश मूर्तीची स्थापना होते अनेक ठिकाणच्या उत्सव आणि परंपरा या लक्षवेधी ठरतात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे या कुटुंबात एक वेगळा गणेशोत्सव साजरा होतो.
रशियातील सेंट पिटरबर्ग येथील असलेल्या मरिअण्णा या ख्रिश्चन धर्मातील असून,त्यांनी हिंदू धर्मातील डॉ.विवेक आबनावे यांच्याशी विवाह करून सामाजिक एकतेचा संदेश दिला असून,तसेच विवाह नंतर दोन्ही कुटूंबानी आपआपल्या धार्मिक परंपरा जपण्याचे काम अखंडित अविरतपणे सुरू ठेवले आहे.. राज्यातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रथा आणि परंपरा या पाहायला मिळतात असाच एक सामाजिक संदेश जेजुरी येथील या आबनावे कुटुंबाने दिला आहे.
संपूर्ण गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेतातील माती पासून सव्वा,एक फूट अशा विविध आकाराच्या तीन गणेशमूर्तींची त्यांनी निर्मिती केली आहे.गणेश मूर्तींची निर्मिती करताना अथर्वशीर्ष पठण व धार्मिक पूजापाठ केला जात असल्याचे ते सांगतात.संपूर्ण जगातील विविध देशात गणेश उपासक पाहायला मिळतात सर्व ठिकाणच्या संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी भक्ती एकच असल्याचं या संपूर्ण कुटुंबाचा मानस आहे २७ -२८ वर्षांपासून या कुटुंबाने या उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.
" गेल्या २८ वर्षांपासून आमच्या
कुटुंबामध्ये इकोफ्रेंडली मातीची
गणपतीची मूर्ती बनवून गणेशोत्सव
साजरा केला जातो.हे करताना
मनाला एक वेगळा आनंद प्राप्त होतो.
मरीअण्णा आबनावे ( एक रशियन महिला )"