Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकर येथे शिवजयंती निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

वडगाव निंबाळकर प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर ता.बारामती येथील श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील ६० स्पर्धकांनी भाग घेतला. चार गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेेळी विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ वडगाव निंबाळकरच्या माजी सरपंच संगिताराजे राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजेनिंबाळकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन साठे, ग्रामपंचायत सदस्या प्रेमलता रांगोळे, अनिता जाधव, सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र जाधव, निलेश रांगोळे, हेमंत ढोले, सुरेश निकम उपस्थित होते. परिक्षणासाठी सुनिता खोडवे, स्वाती भोसले, अरूण गुंजाळ, अशोक गवळी, तेजस शेळके, निलेश जाणकर उपस्थित होते. चिंतामणी क्षीरसागर यांनी प्रास्ताविक संदिप आगम यांनी सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी आभार मानले.
गटनिहाय निकाल अनुक्रमे पुढील प्रमाणे
इयत्ता पहिली ते चौथी छोटा गट
अनुष्का गजानन ठोंबरे जि. प. प्राथमिक शाळा मुरूम, श्लोक ज्ञानेश्वर भापकर विद्या प्रतिष्ठान बारामती, अक्षदा सतिश कोळकर जि. प. प्राथमिक शाळा होळ (आठफाटा), तनिष्का पांडुरंग ढवाण शारदाबाई पवार विद्यालय शारदानगर, निलराज श्रीकांत कराडे जि. प. प्राथमिक शाळा शिवनगर, कैवल्य महेश खेडकर विद्या प्रतिष्ठान बारामती
इयत्ता पाचवी ते सातवी माध्यम गट
श्रुतिका पांडुरंग चव्हाण शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर, संस्कृती संजय जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे, भक्ती श्रीकांत कराडे शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर, भूमी संपत कराडे शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर, गौरी दत्तात्रय धुमाळ सिद्धेश्वर हायस्कूल कोराळे बुद्रुक, रुद्रणील जयराज लाड शारदाबाई विद्यालय शारदानगर
इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट
संस्कृती संजय आगम स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर, मयुरी अशोक भोसले छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी, आदिती संतोष कुलकर्णी विद्या प्रतिष्ठान बारामती, तुषार भारत लकडे यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा मुर्टी, ऋतुजा नवनाथ साळुंखे सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर
खुला गट
निनाद दत्तात्रय पवार बारामती कॉलेज ऑफ फार्मसी बऱ्हाणपुर, चेतन नामदेव भोसले विद्या प्रतिष्ठान सिनियर कॉलेज बारामती, श्वेता संजय जाधव शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोमेश्वरनगर, मधुरा देवचंद शिंदे मयुरेश्वर जुनियर कॉलेज मोरगाव, पुजा सोपान ढोणे मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, मयुरी प्रवीण जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test