Type Here to Get Search Results !

पिंपळीत अहिल्यादेवी यांच्या २९६ जयंतीनिमित्त तरुण वर्गाच्या वतीने २९६ वृक्षांचे वाटप,रक्तदान शिबिर व कोरोना योध्यांचा सत्कार समारंभ संपन्नपुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त तरुणांनी घेतलेला सामाजिक उपक्रम स्तुत्य: पो.नि.नामदेव शिंदे

पिंपळीत अहिल्यादेवी यांच्या २९६ जयंतीनिमित्त तरुण वर्गाच्या वतीने २९६ वृक्षांचे वाटप,रक्तदान शिबिर व कोरोना योध्यांचा सत्कार समारंभ संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त तरुणांनी घेतलेला सामाजिक उपक्रम स्तुत्य: पो.नि.नामदेव शिंदे


बारामती प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
   अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात.
आज बारामती तालुक्यातील पिंपळी गाव कोरोना मुक्त केल्याबद्दल पिंपळी-लिमटेक गावातील कोरोना योध्याचा सत्कार पिंपळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव केसकर यांच्या वतीने पिंपळीतील कोरोना योद्धे पिंपळी आरोग्य उपकेंद्राचे सी.एच.ओ.डॉ.दिपाली शिंदे,आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी, शिक्षक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका आदींचा सत्कार स्मृतीचिन्ह व प्रशिस्त पत्र देऊन करण्यात आला.
  तसेच तरुण वर्ग मुंबई पोलीस शरद केसकर, बापू केसकर,अमोल केसकर, सचिन केसकर, संदिप केसकर आदींच्या वतीने रक्तदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला. 
  त्याचप्रमाणे पिंपळीतील शेतकऱ्यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्ताने २९६ झाडाचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन मा.सरपंच नितीन देवकाते, तुषार थोरात, रणजित देवकाते,सूरज बनकर,अजित देवकाते, महादेव केसकर,संतोष केसकर,प्रताप केसकर,संदीप केसकर, सोनू चोरमले,हनुमंत देवकाते,सचिन देवकाते,स्वप्नील देवकाते,अमोल देवकाते आदी तरुण युवकांनी केले. 


गावातील तरुण वर्गाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोप वाटप,रक्तदान शिबिर व कोरोना योद्धे सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते वृक्ष वाटप व रक्तदान शिबिर कार्यक्रमाची फीत कापून शुभारंभ करण्यात आला.
वृक्षवाटप मध्ये उत्पन्नाच्या दृष्टीने प्रामुख्याने आंबा,चिकू, जांभूळ, पेरू, फणस, अंजीर अश्या फळ झाडांचा समावेश होता.
    
सध्या देशभरामध्ये कोरोनाची महामारी सुरू आहे आणि यात अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि ब्लड मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. भविष्यात याच वृक्षाच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे आम्ही २९६ व्या अहिल्यादेवी जयंतीनिमित्त २९६ वृक्षांचे वाटप आणि रक्तदान शिबीर,कोरोना योद्धे सत्कार, पिंपळी लिमटेक येथील तरुण वर्ग केसकर,देवकाते, थोरात मित्र परिवाराने एकत्रित येत सर्व कार्यक्रम संयुक्तपणे घेतल्याचे नितीन देवकाते यांनी सांगितले.

पिंपळी-लिमटेक गावातील तरुण वर्गाने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने वृक्ष वाटप,रक्तदान आणि गावातील कोरोना योद्धे यांचा सत्कार हे संयुक्तपणे घेतलेले कार्यक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद असेच आहेत. रक्तदान हे पुण्याचे काम असून रक्तदानामुळे जीवनदान देण्याचे कार्य घडते तर वृक्षाच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळणार आहे.कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेक जणांचे जीव देखील गेले आहेत. 
सद्या ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे हे दुर्दैवी आहे. वृक्षलागवडीतून नैसर्गिक प्राणवायू ऑक्सिजन निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. कोरोना योद्धेचा सत्कार हे त्यांना बळ प्रोत्साहन देणारे असून ते अधिक जोमाने काम करतील. पिंपळी गाव कोरोना मुक्त झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले. तसेच कोरोना जोपर्यंत राज्यातून व देशांतून हद्दपार होत नाही.तोपर्यंत कोरोना नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.मास्क सॅनिटायजरचा वापर करावा,अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून त्यांचे गुण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत. जयंतीनिमित्त घेतलेला कार्यक्रम स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करून भविष्यात सर्वच महापुरुषांच्या जयंतीला गावतील सर्व तरुण वर्गानी एकत्रित येत असे विधायक उपक्रम राबवावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

याप्रसंगी खंडाळा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अबरीश भुसळा,बारामती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,बारामती खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसो भिसे, बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, सरपंच मंगल केसकर,उपसरपंच राहुल बनकर,  पोलीस पाटील मोहनराव बनकर, पिंपळीचे तलाठी तेजस्वी मोरे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,विविध विकास सोसायटीचे अशोकराव देवकाते,शेतकरी संघटनेचे विकास बाबर,ग्रा.पं.सदस्य आबासाहेब देवकाते, अजित थोरात,वैभव पवार, बापू पिसाळ, ग्रामस्थ अशोकराव ढवाण पाटील,पप्पू टेंबरे,कालिदास खोमणे, विजय बाबर,लालासाहेब चांडे, मा.सरपंच रमेश देवकाते, आबासो मारुती देवकाते,दादासाहेब केसकर, तुळसीदास केसकर,रमेश दिनकर देवकाते, बाळासाहेब केसकर, रघुनाथ देवकाते, दिपक देवकाते,अनिल बनकर आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

     तरुणवर्गाने जयंतीनिमित्ताने एकत्रित येत घेतलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद पद असून असेच सर्वांनी सलोख्याने कार्यक्रम घ्याव्यात असे मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्वांना छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी व्यक्त करून अभिवादन करून उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल केसकर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव केसकर यांनी मानले.

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test