Type Here to Get Search Results !

करंजे येथे SPL 'सोमेश्वर प्रिमियर लीग' चा उदघाटन सोहळा संपन्न.

करंजे येथे SPL 'सोमेश्वर प्रिमियर लीग' चा  उदघाटन सोहळा संपन्न.
सोमेश्वरनगर - राजकीय , सहकार क्षेत्रात नेहमीच व्यस्त असणारे आज मात्र SPL सोमेश्वर प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते यामध्ये प्रथम  सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उत्कृष्ट गोलंदाजी  करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगली फलंदाजी करण्याची संधी दिली तसेच व्हाईस चेअरमन आनंद कुमार होळकर ,संचालक संग्राम सोरटे ,प्रवीण कांबळे यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत समाधान व्यक्त केले क्रिकेटच्या मैदानावर आयोजकांचे आभार व शुभेच्छा देत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला तर  तरुण पिढीने आपल्या आरोग्यासाठी मैदानी खेळावरच लक्ष द्यावे असेही आव्हान याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केले

 
SPL 'सोमेश्वर प्रिमियर लीग' चे उद्घाटक शनिवार दि २६ रोजी सकाळी ९:३० वाजता बारामती तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप व्हाईस चेअरमन आनंद कुमार होळकर संचालक नवनाथ उद्योग समूह अध्यक्ष व विद्यमान संचालक संग्राम सोरटे , प्रवीण कांबळे  यांच्या शुभहस्ते  
उदघाटन सोहळा संपन्न झाला तर प्रमुख उपस्थिती आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, दत्तात्रय फरांदे ,शिवाजी शेंडकर, सचिन मगर, माजी सैनिक नितीन शेंडकर ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, किरण शेंडकर ,निलेश गायकवाड, सह इतर ग्रामस्थ व सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच लिलावाद्वारे क्रिकेटपटूंच्या खरेदीतून चार संघमालकांचा सोमेश्वर प्रिमियर लीग ( SPL)२०२२ मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला .

सोमेश्वर परिसरातील सर्व नागरिकांच्या सहभागातून परिसरातील खेळाडूंना संधी उपलब्ध व्हावी यासाठी यावर्षी पासून सोमेश्वर परिसरातील खेळाडू निवडण्यात आले. त्या सर्व खेळाडूंची वर्गवारी वैयक्तिक कामगिरीवर करण्यात आली. त्यामध्ये जवळपास ५२ खेळाडूंनी आपली नोंदणी केली.  या स्पर्धेमध्ये प्रथम चार संघ तयार करण्याचे आयोजक बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार यांनी ठरविले. यामध्ये किरण शेंडकर (ओम वाॅरिअर्स), पापा मुलाणी (पापा फायटर्स), दत्ता सोनवणे (डिएस पॅंथर्स) आणि राजेश भांडवलकर (यश इंडियन्स) यांनी संघ खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.


स्थळ  सटवाई माळ मैदान करंजे, ता. बारामती, जि. पुणे शनिवार व रविवार  वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा सोमेश्वर पंचक्रोशीतील  क्रिकेटप्रेमींनी यामध्येक सहभाग घेऊन आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हजर राहावे अशी विनंती आयोजक बुवासाहेब उंबरे व सोमेश्वर स्पोर्ट क्लब यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test