लोणंद ! लोणंद शहरामध्ये नगरपंचायत तर्फे अतिक्रमणे युद्धपातळीवर परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक गणीभाई कच्ची गोरगरिबांच्या मोडतोड सामानांची विल्हेवाट लावण्यासाठी अखंड परिश्रम घेत आहेत सर्वत्र कौतुक.
लोणंद - लोणंद नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमानाने 20 जून पासून शहरातील सर्व प्रभागातील खोकी स्टॉल दुकान समोरील पत्र्याचे शेड आधी दोन जेसीबी लावून अतिक्रमणावर हातोडा गेले दोन दिवस सुरू आहे गोरगरिबांची खोक्यांची मोडतोड पाहून विद्यमान राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री गणीभाई कच्ची हे स्वतः प्रत्येक कुटुंबांचे सात्वन करून साहित्य वाहून नेण्यासाठी वाटेल ते वाहन करून वेळप्रसंगी स्वतःचे वाहन वापरून कार्यकर्ते जमा करून प्रत्येक कुटुंबाच्या घरी साहित्य टाकण्याचे काम करून अश्रू पुसण्याचे कार्य गेले दोन दिवस सुरू आहे या त्यांच्या कार्याला गरीब जनतेने दुवा देत आहेत त्यांचे वडिल ग्रामपंचायत सदस्य जुन्या काळामध्ये होते तेव्हापासून गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट ते कुटुंब करीत असतात त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गणीभाई कच्ची ग्रामपंचायत सदस्य झाले नंतर त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य झाली त्यांच्या कुटुंबाने प्रभागातील विकासकामे असो कुणाचे लग्न समारंभ पुजा विविध कामांसाठी अहोरात्र वेळ देणारे लोणंद करांसाठी मुस्लिम असून सुद्धा सर्व धर्मियांसाठी झगडणारा एक देव माणूस लोणंद मध्ये कार्यरत आहे नुकतेच ते नगरपंचायतीचे नगरसेवक विद्यमान असल्याने सर्व लोणंद करांना वेळ देऊन विधायक कामासाठी स्वखर्चाने दानधर्म करून कुटुंबातील सर्व सदस्य परिश्रम घेत आहे त्यांचे लो नंदच्या अनेक कुटुंबांनी त्यांचे अभिनंदन केले