Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीरपुणे, अमरावती व नाशिक विभागातील संबंधित जाती/जमातींनी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
पुणे, अमरावती व नाशिक विभागातील संबंधित जाती/जमातींनी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन

मुंबई  : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या तारखा व वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार  संबधित जाती/जमातींनी ठरवून दिलेल्या तारखांना उपस्थित रहावे, असे आवाहन आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

             *पुणे विभागाची सुनावणी दि. 30 जून रोजी व्ही.व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे दु. 2.00 वा. होणार* असून सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत रड्डी या जाती/जमातींनी त्यांनी उपस्थित रहावे.

            *अमरावती विभागाची सुनावणी दि. 5 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती येथे सकाळी 11.00 वा. होणार* आहे. या सुनावणीस हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार, हडगर, केवट समाजातील तागवाले/ तागवाली यांनी उपस्थित रहावे, तसेच तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करण्याबाबतही सुनावणी होणार असून संबंधित जाती/जमातींनी या दिवशी वरील वेळी सुनावणीस उपस्थिती रहावे.

            *नाशिक विभागाची सुनावणी दि. 15 व दि. 16 जुलै, 2022 अशी दोन दिवस* होणार आहे. दि. 15 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11.00 वा. होणाऱ्या सुनावणीस काथार / कंठहारवाणी, कंसारा, अत्तार जातीय तत्सम जातः पटवे, पटवेगर, पटोदर, चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी, नावाडी या जाती / जमातींनी उपस्थित रहावे, तसेच बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णयात दुरुस्तीच्या अनुषंगाने या सुनावणीस उपस्थिती रहावे.

            *दि. 16 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11.00 वा. होणाऱ्या सुनावणीस* वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ., लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगडिया सिख, कानडे / कानडी या जाती / जमातींनी उपस्थित रहावे, असे संशोधन अधिकारी, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
                  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test