Type Here to Get Search Results !

BREAKING पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावासाठी भाग घेऊ शकतात अधिक माहिती.......

पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावासाठी भाग घेऊ शकतात अधिक माहिती.......
पुणे : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे. पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात भाग घेऊ शकतील. त्यासाठी https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. याच संकेतस्थळावर भरतीप्रक्रियेबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. या भरती मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. 

भरती प्रकियेसंदर्भातील अधिक माहिती https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती भरती कार्यालय, मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणेचे संचालक मेजर येसू राजू के यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test