Type Here to Get Search Results !

निवडणूक ! पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

निवडणूक ! पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
बारामती : बारामती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी तालुकाच्या १४ गणातील आरक्षण सोडत आज सकाळी कविवर्य मोरोपंत नाट्य मंदीर, नवीन प्रशासकीय भवन समोर, बारामती येथे काढण्यात आली.

या सोडत कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, निवासी नायब तहसिलदार विलास करे, तहसिल कार्यालयातील कर्मचारी, नागरिक आदी  उपस्थित होते.

बारामती पंचायत समितीच्या  गण रचनेचे आरक्षण  पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले.
सर्वसाधारण- सुपा,  शिर्सुफळ, काटेवाडी, 
वाघळवाडी, आणि निंबुत.
सर्वसाधारण (महिला)- पणदरे, मूढाळे, मोरगाव आणि डोर्लेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)- कऱ्हाटी व 
निरावागज. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग - सांगवी.
अनु. जाती - गुणवडी. 
अनु. जाती (महिला) - वडगाव निंबाळकर.
 
                             0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test