मोरगाव ! दुर्दैवी घटना ...रात्रीच्या झालेल्या अपघातात माय लेका सह तीन जण जागीच ठार.
मोरगाव - बारामतीतील बारामती मोरगाव रस्त्यावर - फोंडवाडा नजिक टोयाटो कंपनीच्या अर्बन क्रूजर गाडीने धडक दिल्याने गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात माय लेका सह तीन जण ठार झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपाच्या बाजूने चालत येत असलेले दशरथ साहेबराव पिसाळ (वय 62 रा. फोंडवाडा, माळवाडी, तालुका बारामती) व त्याच वेळेस मोरगाव कडून बारामतीकडे टू व्हीलर वर निघालेले अतुल गंगाराम राऊत (वय 22 रा. करावागज ता. बारामती) व त्यांची आई नंदा राउत या तिघांचा मृत्यू झाला. अतुल यांच्या मागे दुचाकी वर बसलेल्या त्यांच्या मातोश्री नंदा राऊत या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सदर चारचाकी ही बारामतीहून पुण्याच्या दिशेने निघाली होती तर दुचाकी पुण्याहून बारामतीच्या दिशेला येत होती. फोडवाडा नजीक हा अपघात झाला असून हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.
अपघातानंतर गाडीचा चालक गाडी सोडून पळून गेला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.