Type Here to Get Search Results !

..... विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

..... विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
पुणे: जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून बंडगार्डन येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह पुणे येथे त्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून निरज सेमवाल यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०५ येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत ते नागरिकांना भेटतील.  त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५४२४०९ असा आहे. 

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अश्विनीकुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०६ येथे दुपारी ४ ते ५ या वेळेत ते नागरिकांना भेटतील.  त्यांचा  संपर्क क्रमांक ८२७५९६९५०० असा आहे. 

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मंझरुल हसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०४ येथे दुपारी ४ ते ५ या वेळेत ते नागरिकांना भेटतील.  त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०४ असा आहे.

निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९७२५४६ असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test