Type Here to Get Search Results !

सुपा ! सराफी दुकानात गोळीबार करून लूटमार करणारे आंतरराज्य टोळी ग्रामस्थ व पोलिसांच्या सतर्कतेने पकडली

सुपा !  सराफी दुकानात गोळीबार करून लूटमार करणारे आंतरराज्य टोळी ग्रामस्थ व पोलिसांच्या  सतर्कतेने पकडली
सोमेश्वरनगर - बारामतीतील सुपा गावचे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानात चार अनोळखी इसमांनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात प्रवेश करून दुकानातील फिर्यादी व साक्षिदार यांना पिस्टलचा धाक दाखवून जबदस्तीने फिर्यादीचे दुकानातील एकुण २०.०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये तसेच १.३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून दुकानाबाहेर पडले. तोपर्यंत फिर्यादी यांनी दुकानाचा सायरन वाजवून आपले दिराला व आजुबाजूच्या लोकांना हाक मारली, अशोक बोरकर, आण्णा चांदगुडे व आजुबाजूचे लोक तसेच सुपा पोलीस चौकीचे पो. ना. दत्तात्रय धुमाळ हे त्यांचे मदतीला गेले व त्यांनी एक इसमाला एक गावठी पिस्टल १८ जिवंत राऊंडसह रू. ११ लाख ३९ हजार रुपये- किमतीचे सोन्याचे दागिने असलेली काळया रंगाच्या सँगसह पकडले. ग्रामस्थ व पोलीस आरोपींना पकडत असताना आरोपांनी केलेल्या गोळीबारामध्ये अशोक बोरकर व आण्णा चांदगुडे हे जखमी झाले आहेत तसेच उर्वरीत आरोपी हे पांढ-या रंगाचे किया कंपनीच्या सेल्टोंस गाडीतून पळून गेले होते, पकडलेल्या आरोपीचे नाव पवन जगदीश विश्वकर्मा, वय २० वर्षे, रा. मिजांपुर जंगी रोड, चंद्रदिपा ता. मोहरीवा, राज्य उत्तरप्रदेश असे आहे. त्याबाबत अश्विनी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करून उर्वरीत आरोपी अटक करण्यासंदर्भात मा, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो यांनी स्वतः घटनास्थळी तात्काळ भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव निंबाळकर पो.स्टे., राजगड पो.स्टे. A. T.S. पुणे प्रा. ची वेगवेगळी पथके तयार करून तपासकामी रवाना केलेली होती तसेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन सोलापूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण जिल्हयात सक्त नाकाबंदी लावण्यात आली होती.त्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून पकडलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून व गाडीचे वर्णनावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गाडीचा चित्तथरारकपणे गाडीचा पाठलाग सुरू केला दरम्यान आरोपी हे अहमदनगर जिल्हयातून प्रवास केल्याने अहमदनगर जिल्हयात नाकाबंदी लावली होती आरोपी हे पाथर्डी पोलीस स्टेशन हडीतील पाथर्डी चौक या नाकाबंदी लावलेल्या ठीकाणावर आले असता आरोपींनी पोलीस वाहनास हॅश देऊन पुढे निघुन गेले त्यानंतर आरोपीचा पोलीस पथकाने पुन्हा पाठलाग केल्यानंतर आरोपींनी त्यांचेकडील गाडी निवडुंगे गावचे शिवारात रोडचे बाजूला लावून शेतात पळून गेले तेव्हा पोलीस पथकाने चिवट व चित्तथरारक पध्दतीने पाठलाग सुरू ठेऊन पळून गेलेल्या तीन आरोपीपैकी एका आरोपीस एक पिस्टल ६ जिवंत काडतुसे, मोबाईल फोन सह पकडण्यात पोलीसांना यश मिळाले असून पकडलेल्या आरोपीचे नाव प्रदिप भैय्यालाल बिसेन, वय ३३ वर्षे, रा. अभियंतानगर, खटवा, ता. जि. गोंदीया असे आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल,  अप्पर पो. अधी. बारामती विभाग आनंद भोईटे,  गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश शिळीमकर, पो.स. ई. अमित सिद पाटील, पो.स.ई. गणेश जगदाळे, सहा. फौज. बाळासाहेब कारंडे, तुषार पंदारे, पो.हवा. स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंगे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, जनार्दन शेळके, राजु मोमीन, चासफी काशीनाथ राजापुरे चा. पो. कॉ. अक्षय सुपे तसेच वडगाव निबाळकर पोस्टेचे स.पो.नि. सचिन काळे, पो.स. ई.सलीम शेख, पो.स. ई. योगेश शेलार, सहा. फौज, वारूळे, पो. हवा. कुलकर्णी, अनिल खेडकर, पो.ना. अनिल दणाने, पो. ना. देशमाने, पो.कॉ. पोपट नाळे, पो. कॉ. सचिन दरेकर, पो. कॉ. अमोल भुजबळ तसेच तसेच राजगड पो.स्टे.चे, स. पो. नि. मनोजकुमार नवसरे, पो. कॉ. मोहसीन A. T.S. पुणे प्रा. यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता अहमदनगर पोलीसांची सुध्दा मदत झाली आहे. सदर गुन्हयातील अटक असणारे दोन आरोपींना आज रोजी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दि १० रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास
वडगाव निंबाळकर साहेब पोलीस निरीक्षकसचिन काळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test