Type Here to Get Search Results !

कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक व्यवस्थेत बदल

कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक व्यवस्थेत बदल
 
पुणे : कोंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु असल्यामुळे शितल पेट्रोल पंप चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० जूनपर्यंत बंद करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून वेलकम हॉल जंक्शन, मेफेअर सोसायटी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप अशी एकेरी वाहतूक सुरु राहणार आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test