Type Here to Get Search Results !

दिपावलीनिमित्त लोणीभापकर येथे गरजूंना कपडे वाटप

दिपावलीनिमित्त लोणीभापकर येथे गरजूंना कपडे वाटप
बारामती तालुक्यातील लोणी भापकर विलासआबा मित्र मंडळाच्या वतीने येथील ६० गोरगरीब तरुण,वृध्द पुरुष,अपंग,विधवा,परितक्ता महिलांना   दिवाळी निमित्त मोफत कपडे वाटप करण्यात आले. गेली अठरा वर्षापासून या मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमा वेळी बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भैया भापकर, माजी सरपंच विजय बारवकर, आबा ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते विलास आबा भापकर, गोविंद भापकर,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भापकर, अविनाश बनसोडे, तरडोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान धायगुडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिलीप जगदाळे,पोलीस पाटील संजय गोलांडे यांच्यासह किरण भापकर, गजानन भापकर, अमोल मदने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वयंभू नगर सोसायटीचे चेअरमन विजय गोलांडे यांनी केले तर आभार आबा ठोंबरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test