Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! पंचक्रोशी प्रकाशन चे साला बाद प्रमाणे दीपावली काव्य संमेलन संपन्न....

सोमेश्वरनगर ! पंचक्रोशी प्रकाशन चे साला बाद प्रमाणे दीपावली काव्य संमेलन संपन्न....

सोमेश्वरनगर - शब्द सारस्वतांच्या हक्काच्या व्यासपीठावर पंचक्रोशी प्रकाशन संस्था वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य मैफिल मध्ये बारामती परिसरातील तसेच महाराष्ट्राच्याकाना कोपऱ्यातुन एकूण पंचावन्न कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ....पंचक्रोशी प्रकाशनचे  संपादक अध्यक्ष बाळासो करचे आण्णा हे नेहमीच साहित्य क्षेत्रासाठी आपले योगदान देत असतात..त्यांनी लावलेल्या हक्काचे  व्यासपीठ या छोट्या रोपट्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर होत आहे..दीपावली काव्य संमेलन तसेच रेश्मा गडकर स्वलिखीत हृदयातील स्पंदन काव्य संग्रह प्रकाशन सोहळा,त्याचबरोबर विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ २६ नोव्हेंबर २०२३रोजी आनंदात पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी लाभलेले मा संजय जाधव साहेब यांनी  शुभेच्छा दिल्या.त्याच बरोबर साहित्य कसे असावे,त्याची रंग रूप रेषा कशी असावी यावर मार्गदर्शन केले..कार्यक्रमामध्ये संविधान दिनानिमित्त मा अलका रसाळ , मा वनिता जाधव यांनी संविधान वाचन केले. मा सुवर्णा जमदाडे यांनी संगीतमय स्वागतगीत सादर केले त्याच बरोबर मनवा गायकवाड या लहान मुलीने गणेश वंदना सादर केली,तेजस्वी धमाळ  यांनी सुमधुर बासरी वादन करून श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले....यावेळी चित्रपट निर्माते सचिन रणपिसे, पाठ्य पुस्तक कवयित्री अस्मिता जोगदंड /चांदणे, विजया चांदगुडे,धनंजय मार्डीकर, प्रा.शरदचंद्र काकडे,अध्यक्ष भाग्यलक्ष्मी फाऊंडेशन सागर तानाजी वायाळ,जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा प्रा, शि,स.सुनील वाघ,संचालक जनार्दन चौधरी,तलाठी इनामदार,आदर्श शेतकरी संदीप होळकर, अ.भा.म सा. प .पुणे.ज्ञानेश्वर धायरीकर ,हभप सोमनाथ जाधव,शेती माती मधील कवी सोमनाथ सुतार,युवराज खलाटे,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप सौ शुभांगी सोमनाथ जाधव काशीकर यांनी केले. योगेश हरणे,वनिता भूतकर .त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन रवींद्र गडकर सर यांनी मानले...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test