Type Here to Get Search Results !

भयानक ... मानसिक छळ... हातपाय ओढणीने बांधत पाण्यात बुडवत विवाहितेचा खून...बारामतीतील मासाळवाडी येथील प्रकार.

भयानक ... मानसिक छळ... हातपाय ओढणीने बांधत पाण्यात बुडवत विवाहितेचा खून...बारामतीतील मासाळवाडी येथील प्रकार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे ऐका विवाहितेचा मानसिक व शारीरिक  छळ करत हातपाय ओढणीने हात पाय बांधत तिला शेततळ्यात बुडवून तिचा खून केल्याचा प्रकार घडला सदर प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकऱणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे राहणार मासाळवाडी तसेच नणंद आशा सोनबा कोकरे व नंदावा सोनबा चंदर कोकरे राहणार कुतवळवाडी, ता. बारामती या चौघांना पोलिसांनी अटक केली.

सदर या प्रकरणी दौंड तालुक्यातील गिरीम येथील नामदेव बबन करगळ यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दि. २४ रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मासाळवाडीतील भगवान बिरा गडदरे यांच्या शेततळ्यात ही घटना घडली. फिर्यादीची मुलगी सुरेखा हिला या चौघांनी शारिरिक, मानसिक छळ करत त्रास दिला. पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेततळ्यात तिला पाण्यात बुडवून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे ,सोनवलकर साहेब अधिक तपास करत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test