बहुजन समाज सेवा संघ वतीने वडगाव निंबाळकर “सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे”पुरस्कार मिळालेबद्दल सत्कार.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस “सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे” म्हणून सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम शुक्रवार दि. १५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे संपन्न झालेल्या गुन्हे शाखेच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ऑक्टोबर २०२३ महिन्यातील तुलनात्मक कामगिरीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांची सर्वोत्तम कामगिरी केल्याचे निश्चित झाले,व याच आधारे “सर्वोत्तम पोलीस स्टेशन” म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची निवड करण्यात आली व पोलीस स्टेशनचा द्वितीय क्रमांक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच करंजे पुल दुरक्षेत्र नव्याने रुजू झालेले पी एस आय कन्हेरे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष पोपट हुंबरे,कार्याध्यक्ष पत्रकार विनोद गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी शेंडकर, सोमनाथ सावंत सह वडगाव पोलीस स्टेशन तसेच करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होता.