Type Here to Get Search Results !

महत्त्वाची सूचना ! बारामती शहरात ३ मार्च रोजी पोलिओ लसीकरण

महत्त्वाची सूचना ! बारामती शहरात ३ मार्च रोजी पोलिओ लसीकरण
बारामती - बारामती शहरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओचा डोस दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

पोलिओ डोसपासून काही बालके वंचित राहिल्याने पोलिओचे उच्चाटन होण्यास अडथळा होतो. त्यासाठी या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेचा सर्वांना सुलभ लाभ मिळावा यासाठी उपजिल्हा रुग्णालयामार्फत शहरात एकूण ६२ बूथ तयार करण्यात आले आहेत. 

सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन बारामती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test