Type Here to Get Search Results !

अभिमानास्पद ! विद्या प्रतिष्ठानचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा १००% निकाल

अभिमानास्पद !  विद्या प्रतिष्ठानचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा १००% निकाल

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ८ वी व ९ वी चे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४च्या चित्रकला ग्रेड परीक्षांसाठी प्रविष्ट झाले होते.
   इयत्ता ८ वी तील विद्यार्थी एलिमेंटरी ग्रेड परीक्षांसाठी प्रविष्ट होते. एकूण १६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील अ श्रेणीतून ६ विद्यार्थी ब श्रेणीतून तर २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तसेच  ९ वी तून १८ विद्यार्थी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेला बसले होते. त्यातील अ श्रेणी मधून ४ विद्यार्थी ब श्रेणी मधून ७विद्यार्थी तर क श्रेणीतून ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेतील कलाशिक्षिका रूपाली कदम व स्वप्ना वेदपाठक यांनी सदर परीक्षेसाठी मुलांना मार्गदर्शन केले. १००% निकालाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test