युवा नेते जयदादा पवार यांचा गावभेट दौरा दरम्यान माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड कुटुंबाची घेतली सदिच्छा भेट
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे सोमावर दी २३ रोजी युवा नेते जयदादा पवार यांचा (अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) आयोजित गावभेट दौरा युवा जेष्ठ महिला पदाधिकारी यांच्या उपस्थतीमध्ये संपन्न झाला.
यावेळी आवर्जून करंजेपुल माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड यांच्या घरी जात सदिच्छा भेट घेतली.
जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही सुद्धा तुमच्या वयाचे असताना अजितदादांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि आहे असे बोलताना आवर्जून गायकवाड यांनी जयदादांना सांगितले तसेच त्यांना अल्बम मधील त्याकाळी अजितदादांसोबत काढलेले छायाचित्रे दाखवले वेळेसही असेच आम्ही अजित दादा सोबत सोमेश्वर पंचक्रोशीतील कार्यकर्ते एकत्र येत दौरे केले असल्याचेही त्यांना सांगितले.
यावेळी सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, करंजेपुलव माजी सरपंच वेभाव गायकवाड, करंजे विकास सोसायटी चेअरमन साहेबराव गायकवाड, माजी चेअरमन अनिल गायकवाड, उद्योजक सागर गायकवाड, अजित गायकवाड, सूर्यकांत गायकवाड,धीरज गायकवाड, सुहास गायकवाड, प्रवीण गायकवाड, मंगेश गायकवाड निखिल शेंडकर, मयूर गायकावाड उपस्थित होते.