Type Here to Get Search Results !

बारामती ! माळेगाव येथे निवडणूक विषयक प्रशिक्षण संपन्ननिवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर

बारामती ! माळेगाव येथे निवडणूक विषयक प्रशिक्षण संपन्न
निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर

बारामती - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पाडावी, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिले. 

अभियांत्रिकी महाविद्यालय माळेगाव येथे आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, नायब तहसीलदार पूनम दंडिले आदी उपस्थित होते.  

श्री. नावडकर यांनी मतदानाची प्रक्रिया, मतदान यंत्र हाताळणी, वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, अभिरुप व ईडीसी मतदान प्रक्रिया, दिव्यांग मतदारांचे मतदान, मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे अहवाल, निवडणूकविषयक कागदपत्रे आदीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देऊन ते म्हणाले, या सर्व बाबींमध्ये अतिशय काळजीपूर्वक भूमिका बजावावी. निवडणुकीचे कामकाज अतिशय गांभीर्याने घ्यावे, याकामी कोणताही हलगर्जीपणा करु नका, असेही श्री. नावडकर म्हणाले. 

 २६ व २७ ऑक्टोबर या दोन दिवशीय आयोजित प्रशिक्षणात मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचारी असे मिळून ३ हजार १२० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. क्षत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र ईव्हीएम हाताळणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, तसेच मतदान यंत्राच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test