बारामती तालुका प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामती - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या कार्यालयात ( दि.१२ ) रोजी पासून खाजगी दुचाकी वाहनांसाठी नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू करण्यात येत आहे. मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या चारचाकी व दुचाकी वाहन मालकांना, आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकचे विहित शुल्क, अर्ज नमूना व आवश्यक कामासाठी भराव्या लागणाऱ्या शुल्काची माहिती आवश्यक आहे. त्यांना कार्यालयीन वेळेत (दि. ०८ रोजी ) पर्यंत सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या चारचाकी खाजगी संवर्गातील (LMV NT) वाहन मालकांना दुचाकी संवर्गातील वाहन मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकीसाठी विहीत शुल्काच्या तिप्पट शुल्क भरुन हवे असतील त्यांनी (दिनांक १२) रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या दरम्यान अर्ज व शुल्क रक्कमेच्या डी.डी (नॅशनलाईज्ड) सह जमा करावा.
अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा. लाईट बिल,इ.) तसेच अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र (उदा. आधार कार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅन कार्ड इ.) ची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.
दि. १२/११/२०२४ रोजी स्विकरण्यात आलेल्या चार चाकी खाजगी संवर्गातील (LMV NT) एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक १२/११/२०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरचे बंद पाकीट लिलाव पध्दतीने वाटप केले जाईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी दिनांक १३/११/२०२४ या दिवशी दुपारी ०३.३० वाजेपर्यंत सीलबंद लखोट्या लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फीच्या डीडी व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डीडी एका पाकिटात स्वतः जमा करावा. सदर डीडी 'Dy.R.T.O., Baramati' यांच्या नांवे नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बैंक (शेड्युल्ड बँकेचा डीडी बारामती येथील असावा). त्यासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील.
दिनांक १३/११/२०२४ दिवशी दुपारी ०४.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार/ प्रतिनिधी) लखोटा उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डोडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. दि. १३/११/२०२४ रोजी दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनाकरिता उर्वरित पसंती नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता विहीत शुल्काच्या डीडी सह अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी ०३.०० या दरम्यान स्विकारण्यात जातील.
दि. १३/११/२०२४ रोजी दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनाकरिता उर्वरित पसंती नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता स्विकरण्यात आलेल्या एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक १४/११/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. एकाच नंबर करिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरचे बंद पाकीट लीलाव पध्दतीने वाटप केले जाईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी दिनांक १४/११/२०२४ या दिवशी दुपारी ३.३० वाजेपर्यंत सीलबंद लखोट्यात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फी च्या डोडो व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डीडी एका लखोट्यात स्वतः / प्रतिनिधी मार्फत जमा करावा. सदर डीडी 'Dy.R.T.O., Baramati' यांच्या नावे बारामती येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची/आधार कार्ड साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. दिनांक १४/११/२०२४ दिवशी दुपारी ०४.३० वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लखोटा उघडून ज्या अर्जदाराने विनिदीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा आरक्षित ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. आरक्षित ठेवलेल्या दिनांका पासून विहित मुदतीच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.