मुख्य संपादक विनोद गोलांडे.....
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांचा आषाढी वारीनिमित्त बाळचमूचा दिंडीसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या दिंडी सोहळ्यात रिंगण, फुगड्या खेळून महिलांनीही या उत्सवात रंग भरला. विठू नामाचा गजर करत दिंडी गावभर फिरली. छोट्या चिमुकल्यानी विठ्ठल रुक्मिणी वेष परिधान केला होता. पालखीची सजावट करून ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. हरिनामाच्या गजरात शेंडकरवाडी परिसर विठ्ठलमय झाला.
या दिंडीला गणेश शेंडकर व सोमनाथ चोरगे यांनी खाऊ वाटप केले. ग्रामस्थांनी या दिंडी सोहळ्याचे कौतुक केले.
याप्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष मयूर शेंडकर, सदस्य सोनाली गायकवाड, मा. सदस्य राणी महानवर, श्रीकांत शेंडकर, शालन शेंडकर, लता शेंडकर, सुवर्णा शेंडकर, राहीबाई भोसले, मंदा चोरगे, राणी शेंडकर, सुवर्णा शेंडकर, माया सुतार, नीलिमा काळूखे, सारिका शेंडकर, पूनम माने, पारुबाई शेंडकर, वर्षा शेंडकर, अमृता शेंडकर व महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सतिश पिसाळ, हंसा वाळा, रेश्मा शेंडकर, मीनाक्षी बडेकर यांनी केले.