दिवंगत अजितदादा पवार जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
चला ज्ञानमंदिराच्या वारीला!...पालखी, ग्रंथ व वृक्ष दिंडी सोहळा.लखास आकर्षण घोडे रिंगण मेंढी रिंगण
खास आकर्षण घोडे रिंगण ...मेंढी रिंगण
"वारीला यायलाच लागतंय!"
बारामती तालुक्यातील माळवाडी येथील सर्व पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर, वारकरी, भजनी मंडळ, महिला भगिनी, पालक व समस्त ग्रामस्थांना कळविण्यात येते की,
बुधवार, दि. २२ जुलै २०२६
सकाळी ८.०० वाजता स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळवाडी (करंजे)
या ठिकाणी पालखी, ग्रंथ व वृक्ष दिंडी सोहळा तसेच दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून या नयनरम्य व भव्य-दिव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा.
आषाढी वारीस प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणे ज्यांना शक्य झाले नाही, त्यांनी आपल्या माळवाडीच्या ज्ञानमंदिरातील या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन चार पावले चालत येथूनच पांडुरंगाच्या दर्शनाचा आध्यात्मिक आनंद घ्यावा.
सर्वांनी या सोहळ्यास पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहावे. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी टाळ, मृदुंग, भगवे पताके व तुळशी वृंदावन सोबत आणावेत.
कार्यक्रम पत्रिका
विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती व पालखी पूजन.
दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन.
सुमधुर अभंग गायन कार्यक्रम .
टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखीची ग्रामप्रदक्षिणा.
खास आकर्षण – घोडे रिंगण व मेंढी रिंगण.
पालखी मार्गावरील निवासस्थानांजवळ पालखी पूजन.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शाळेस कलर प्रिंटरचे वाटप.शुभहस्ते : मा. श्री. संभाजीनाना होळकर(अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वह्या) वाटप.
शाळेच्या प्रांगणामध्ये विविध वारकरी सांस्कृतिक नृत्य सादरीकरण.
महाआरती.
महाप्रसाद (सांबर-भात, शिरा ) व केळी वाटप.
विनम्र आवाहन
शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक सहकार्य करून या उपक्रमाला हातभार लावावा, ही नम्र विनंती.
संपूर्ण भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे चित्रीकरण ड्रोन कॅमेरा द्वारे केले जाणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळवाडी (करंजे) व अंगणवाडी



