Type Here to Get Search Results !

लवकरच कोरोनावर फक्त २२५ रूपयांत सिरमची लस

 

पुणे प्रतिनिधी

आॅक्सफर्ड या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावर करत असलेल्या लस संशोधनात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. जीव्हीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेने व मेलिंडा अॅन्ड बिल गेट्स फाऊंडेशनने या लस विक्रीसाठी ११२५ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला असून त्यामुळे कोरोना वरील लस १० कोटी लोकांना फक्त २२५ रूपयांत मिळेल. 

सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी व्टिटरवर अशी माहिती दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत हा एक मोठा दिलासा सामान्य लोकांना मिळाला आहे. सध्या आॅक्सफर्ड सोबत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना वरील लस संशोधनात व्यग्र असून  भारतातही या लशीची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. हि लस लवकरच सामान्य लोकांना उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा केली जात असून या टप्प्यातच मेलिंडा अॅन्ड बिल गेट्स फाऊंडेशन व जीव्हीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे लशीच्या किंमतीत सवलत मिळणार असून गरजू देशातील १० कोटी लोकांनी फक्त २२५ रूपयांत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भारतासह गरीब ९२ देशांमध्ये ही लस दिली जाणार असल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली आहे. पुढील वर्षापासून या लशीचे वितरण होईल , अशीही माहिती संस्थेने दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test