Type Here to Get Search Results !

Crime News वडगाव निंबाळकर पोलीसांची कामगिर;चार दिवसांत जबरी चोरीचा छडा: विळयाचा धाक दाखवुन मंगळसुत्र चोरणारे आरोपी गजाआड.

Crime News वडगाव निंबाळकर पोलीसांची कामगिर;चार दिवसांत जबरी चोरीचा छडा: विळयाचा धाक दाखवुन मंगळसुत्र चोरणारे आरोपी गजाआड.


दोन दिवसांपूर्वी एका महिलेला मंगळसूत्र चोरीच्या दृष्टीने विळ्याचा दाख दाखवून फरार झालेले आरोपी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी  केले जेल बंद मिळालेल्या माहितीनुसार ...
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 31/07/2021 रोजी सायं. 05:30 वा.चे सुमारास मौजे उंडवडी सुपे ता.बारामती जि पुणे या गावात पाटस ते बारामती रोडलगत असणाच्या शेतात उडीद पिकाचे खुरपणी करत असताना 3 अज्ञात मुलांनी 'जाधवांचे शेत इथं कोठे आहे असे विचारण्याचा बहाना करून' संबंधित महीलेचे जवळ जावुन त्यांचेच हातातील विळा बळजबरीने घेवुन त्याचा धाक धाकवुन महिलेच्या गळयातील साधारण सोन्याचे 4.75 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र 22  हजार 510 /- किंमतीचे रूपयाचा मुददेमाल जबरीने चोरी करून पल्सर मोटारसयकलवरून भरधाव वेगात उंडवडी सुपे बाजकडुन पाटस बाजुकडे निघुन गेलेले होते. 
         त्या अनुषंगाने घडले प्रकार बाबत सौ लक्ष्मी देवीदास गवळी वय 55 बर्ष, रा.उंडवडी सुपे ता,बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 281/ 2021 भादवि 392,506.34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादीने अज्ञात आरोपींचे सांगितले वर्णनाबरुन आरोपी कोणत्या दिशेने फरार झाले असतील याची नाहीती निळविणे कामी जारामती व दौंड तालुक्यातील विविध मार्गावरील सी. सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करुन त्यात निष्पन्न झालेल्या संशधित आरोपींचे सी.सी.टी.व्ही फुटेज मधील फोटो तसेच रेखाचित्र वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडुन सोशल मिडीया मधुन प्रसारीत करणेत आलेले होते, त्यावरुन इसम नामे 1) सौरभ तात्याबा सोनवलकर वय (20 वर्ष)रा.सस्तेवाडी ता.बारामती 2} सागर दतात्रय जगताप (वय 21) रा.वाणेवाडी ता.बारामती जि.पुणे 3} अल्पवयीन मुलगा रा.सस्तेवाडी ता.बारामती जि.पुणे यांनी हा गुन्हा केलेची गोपनीय माहीती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलीस तमास पथक यांना मिळालेने त्याआधारे दिनांक 05/08/2021 रोजी हे संशयित आरोपी फरार होण्याचे तयारीत असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी  सलीम शेख व इतर पोलीस स्टाफ यांनी सदर आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test