बारामती प्रतिनिधी
रॅपिड अँटीजेन टेस्टमुळे अवघ्या अर्ध्या तासातच रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही हे समजणार असल्याने यंत्रणेवरचा ताणही आपोआपच कमी होणार आहे. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, अशा रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार
आहे. या टेस्टमध्ये अहवाल निगेटीव्ह आला तर पुढील तपासण्या होणार नाहीत, मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर त्याच्यावर लगेचच पुढील उपचार सुरु होणार आहेत.