Type Here to Get Search Results !

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निरा भिमा कारखान्यावरती गणेशाची आरती


इंदापूर प्रतिनिधी

शहाजीनगर ( ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची रविवारी ( दि. २३ ) सायंकाळी आरती करण्यात आली.याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी श्रीगणेशाची विधिवत पूजा केली . 
                 श्री गणेशाच्या कृपेने चालु वर्षी चांगला पाऊस झाला आहे . त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळालेला असला तरी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा  वाढत चालल्याने या संकटातून जनतेची लवकर सुटका होऊ दे , असे साकडे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी विघ्नहर्त्या श्री गणरायाला घातले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार उपस्थित होते . नीरा भीमा कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या गणेश मंदिराच्या सभामंडपामध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे . तत्पूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test