कोरोना रुग्णांसाठी चाकण एमआयडीसी पुरवतेय प्राणवायू,ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शनिवारी विद्युत पुरवठा बंद,ऑक्सिजन उत्पादित कंपनीला विद्युत जोडणीसाठी १३२, २२० kv लाईन बंद
शासकीय व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश
पुणे : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व
वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल
ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व
भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता चाकण
एमआयडीसीतील एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड या कंपनीस मेडीकल ऑक्सिजन उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे. येथील एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष
आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.