इंदापूर प्रतिनिधी
यापूर्वी पालक आपल्या मुलांना मोबाईल देण्यास नकार देत होते, परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे आता सर्वकाही शिक्षण मोबाईलवर होत असल्यामुळे आपण मुलांना मोबाइल देत आहे. सरकारचा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सध्याच्या परिस्थितीत योग्य असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा इंदापूर पॅटर्न प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी दिली.
शहाजी पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी (ता. इंदापूर) येथील तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आणि श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या वतीने आयोजित एस. बी. पाटील वनगळी येथील ऑनलाइन शिक्षणाच्या संदर्भात आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे, एस. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण नेमाडे, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, मुख्याध्यापक विकास फलफले, मुख्याध्यापक चंद्रकांत कोकाटे, उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे उपस्थित होते.