Type Here to Get Search Results !

सोमेश्वर च्या शिक्षण संकुलामध्ये उभे राहणार अद्यावत क्रीडा संकुलन.. लवकरच काम सुरू

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शनाखाली
अद्यावत भव्य क्रिडा संकुल उभे राहणार आहे.
या संकुलाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जिल्हा
क्रिडा अधिकारी विजय संतान, तालुका क्रिडा अधिकारी
जगन्नाथ लकडे, राज्य क्रिडा मार्गदर्शक दादा देवकाते व
शिवाजी कोळी यांनी भेट दिली. या क्रिडा संकुलामध्ये ४०० मीटर रनिंग ट्रॅक, फुटबॉल मैदान, जीम, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस, कुस्ती, कराटे, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबडी, खो-खो इत्यादी मैदाने तसेच ऑफिस, ड्रेसिंग रूम, स्टोअर रूम इत्यादी अद्ययावत
सोयी सुविधांनी युक्त भव्य बहुउद्देशिय हॉल उभारला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुका क्रिडा अधिकारी यांनी संस्थेचे आर्किटेक्ट मिलींद किर्दत व कारखान्याचे सिव्हील इंजिनिअर होळकर

यांनी क्रीडा संकुलनाचा आराखडा बनविण्या संबंधी सूचना केल्या याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , उपाध्यक्ष शैलेश रासकर , बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर संस्थेचे , संस्थेचे सचिव भारत खोमणे , क्रीडा प्रशिक्षक संजय होळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test