Type Here to Get Search Results !

पवारवाडी गावचा अविनाश झाला आय.ए.एस अधिकारी


बारामती प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यामधील पवारवाडी गावचा अविनाश संजीवन शिंदे हा नुकताच आय.ए.एस अधिकारी झाला आहे. त्यास २२६ वी रँक मिळाली आहे.


अविनाश शिंदे याने इंजिनीअरिंगची पदवी घेऊन एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली होती. तीन वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला.व यूपीएससीची तयारी करण्यासाठी अविनाशने थेट दिल्ली गाठली.२०१६ मध्ये त्याची आय.आर.टी.एस( इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस) पदी निवड झाली आहे. त्यानंतर २०१७ मध्ये आय.आर.एस( असिस्टंट कस्टम कमिशनर) पदी निवड झाली आहे. मात्र अविनाशचे स्वप्न आय.ए.एस अधिकारी बनण्याचे होते. त्यानुसार पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून २०१९ च्या यूपीएससीच्या परीक्षेत त्याने आय.ए.एस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.


अविनाश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा  पवारवाडी व माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी येथे झाले. तर पुढील शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पूर्ण केले. याच महाविद्यालयात त्याने इंजिनिअरिंग मध्ये बी.ई  मेकानिकलची पदवी घेतली. कॉलेेज सुरू असतानाच कॉलेज कॅम्पस मध्ये सिलेक्शन झाले.


अविनाशला आय.ए. एस. होण्यासाठी आई, वडिल, भाऊ, बहिणी, वहिनी, चुलते राजेंद्र शिंदे (मोटर वाहन निरीक्षक ,बारामती) अनिल शिंदे, दाजी शांताराम वाकळे, सागर पाटिल, या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test