Type Here to Get Search Results !

कोरोनामुळे आली तमाम तमाशा कलावंतावर उपासमाराची वेळ : शरद पवार यांना दिले निवेदन.



बारामती प्रतिनिधी

राज्यातील तमाशा  कलावंत लॉक डाऊन मुळे प्रचंड अडचणीत आले असून आर्थिक कारणाने  आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत,

यासाठी शासनाने नियमांचे आधारे तमाशा थिएटर सुरू करण्याची मागणी थिएटर मालक संघनटनेने लेखी निवेदनाद्वारे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडे केली आहे,
     या निवेदनाच्या प्रति उप मुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनाही पाठविण्यात आल्या  आहेत,
     या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात एकूण ५५  तमाशा थिएटर असून यामधून  हजारो कलावंत आपली  व आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहेत,
      तमाशा कला ही महाराष्ट्राची पारंपरिक प्रमुख कला असून हजारो कलाकार ही कला जतन करीत आले आहेत,
     मार्च महिन्यात कोरोनामूळे लॉक डाऊन सुरू झाले असून यामुळे तमाशा थिएटर बंद करावे लागले ,  पाच महिन्यानंतर आजही ते बंदच आहे, ऐन कार्यक्रमाचे काळातच थिएटर बंद पडण्याने आणि आजही बंदच असल्याने तमाशा कलांवताची  प्रापंचिक परिस्थिती अत्यन्त खालावली असून परिस्थितीला कंटाळून कलावन्त आत्महत्येचा मार्ग अवलंबू लागले आहेत, उपजीविकेचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कलावन्त देशोधडीला लागतील नियमांची बंधने घालून काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे,          दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रशासनाचे प्रयत्नही सुरू आहेत, यामुळे नियमाचे बंधने घालून राज्यातील तमाशा थिएटर सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी,हजारो कलांतची उपासमार टळेल,यासह त्यांचे प्रपंच मार्गाला लागतील ,
अशी लेखी मागणी केडगाव ( वाखारी ) येथे आयोजित केलेल्या तमाशा थिएटर  मालक आणि तमाशा कलावन्त यांच्या बैठकीत करण्यात आली,
      या बैठकीस राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ, अशोक जाधव, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब काळे, अरुण जाधव, जेष्ठ महिला कलावन्त केशर नांनी घाडगे,  सुरेश आवटी,  सुरेखा पवार, जयश्री जाधव यांचेसह कलावन्त मंडळी उपस्थित होती,  बैठकीत मंजूर केलेल्या मागणीचे लेखी निवेदन राज्य थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ, अशोक जाधव यांचेसह शिस्तमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांना भेटून निवेदन देण्यात आले,
     या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री  अजित पवार , सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनाही पाठविण्यात आल्याचे डॉ, जाधव यांनी नमूद केले आहे,
     तमाशा कलावंतांच्या आधारवड जयश्री जाधव बोलताना म्हणाल्या,  महिला कलाकार अडचणी सांगतात, त्या ऐकून डोळ्यात पाणी येते, खूपच हाल होऊ लागले आहेत, मी तरी कुठे कुठे मदत करू, असे गहिवरून सांगितले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test