विशेष प्रतिनिधी......
निसर्गाचा एक अदभूत चमत्कार टिपण्यासाठी आयुष्यातील १९ वर्षे खर्च करणारा फोटोग्राफर...
जगातील आकाराने सर्वात लहान पक्षी म्हणून बहुमान असलेला, 'हमिंगबर्ड' म्हणजेच 'गुंजन पक्षी' हा निदान तुम्हाला ऐकून तरी नक्कीच माहित असेल, फक्त ३ ते ४ इंचाचा टीचभर आकार असलेल्या या हमिंगबर्ड ला मात्र निसर्गाने एक अतिशय निराळं देणं दिले आहे आणि ते म्हणजे या हमिंगबर्ड च्या पंखातून जेंव्हा सूर्यप्रकाश पास होतो तेंव्हा त्याचे पंख एक अतिशय अद्भुत अश्या इंद्रधनुष्यी रंगाने उजळून निघतात, आणि एक असा फोटोग्राफर आहे ज्याने हा नैसर्गिक चमत्कार टिपण्यासाठी थोडी-थोडकी नव्हे तर आपल्या आयुष्यातील तब्बल १९ वर्षे खर्ची घातली आहेत, आणि त्या फोटोग्राफरचे नाव आहे - *ख्रिस्तियन स्पेन्सर*..
या 'हमिंगबर्ड' चा आकार फक्त ३ ते ४ इंच असतो, पण तो सुमारे ५४ कि.मी. प्रति तास वेगाने उडू शकतो तर एका सेकंदात सुमारे ८० वेळा आपले पंख उघड-झाप करू शकतो आणि परत त्याचा तो इंद्रधनुष्यी अविष्कार दिसण्यासाठी तो सूर्याच्या समोर येणे सुद्धा आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला 'ख्रिस्तियन' ची हि कामगिरी किती कठीण असावी याचा अंदाज येईल, पण आपली सृजनशीलता, धैर्य व चिकाटी यांच्या बळावर मूळचा ऑस्ट्रेलियन असलेल्या 'ख्रिस्तियन' ने मागचे तब्बल १९ वर्षे ब्राझील मधील 'ईटाटीआया नॅशनल पार्क' मध्ये वास्तव करून, आपल्या 'Winged Prism' या प्रोजेक्ट अंतर्गत ‘हमिंगबर्ड’ च्या पंखातील नैसर्गिक इंद्रधनुष्याचे जे फोटो टिपले आहेत ते आज जगात एकमेव्दितीय समजले जातायेत..
एका फोटोग्राफरचे यापेक्षा दुसरे वेगळे स्वप्न काय असू शकते ??