विशेष प्रतिनिधी
श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके व आवडते दैवत आहे , सर्व महाराष्ट्रात मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आज उत्साही वातावरणात घरोघरी करण्यात येत आहे . याच पवित्र भावनेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी पत्नी सारिका भरणे , मुलगा श्रीराज , पुतणी केताली , शीतल व पुतण्या अक्षय व प्रितेश आदी कुटुंबियांसह दिमाखात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली .
यावेळी राज्यमंत्र्यांनी गणरायाला संकटी पावावे - निर्वाणी रक्षावे अशी प्रार्थना करून राज्यावर, देशावर तसेच जगावर आलेले कोरोनाचे विघ्न नष्ट करण्यासाठी व सर्वत्र प्रेमभाव , आनंद नांदण्यासाठी साकडे घातले. यावेळी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी जनतेला देखील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सर्व योग्य ती खबरदारी घेऊन गणरायाचे स्वागत व गणेशोत्सव आनंदात साजरा करावा , असे आवाहन केले .