कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात असताना विविध घटकांतील नागरिकांना उदरनिर्वाह बरोबरच कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक खर्च करणे खुपच जिकिरीचे झाले आहे.
विविध दानशूर मान्यवरांचे सहकार्याने साथ प्रतिष्ठाण माध्यमातून अशा प्रतिकूल परिस्थितीत शिकण्याची जिद्द असलेल्या 08 विद्यार्थ्यांना शालेय दत्तक घेतलेले आहे.
आज रोजी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133 व्या जयंती चे औचित्य साधून युवा उद्योजक सुशिल वाघमारे यांच्या सहकार्यातुन मालोजीराजे विद्यालय ज्यु. कालेज लोणंद येथे इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश केलेल्या कु. आदित्य लालासो जाधव, रा.चव्हाणवाडी या विद्यार्थ्यांस शालेय दत्तक घेत त्यास आवश्यक सर्व साहित्य भेट देऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
याप्रसंगी मालोजीराजे विद्यालय लोणंदच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा नेवसे मॅडम, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, चव्हाणवाडीचे पोलीस पाटील सुरेश चव्हाण आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.