कोरोना या महामारीने जगातील सर्वच कुटुंबे त्रस्त झाली आहे व त्यांचा आर्थिक नुकसान आलाही सामोरे जात आहेत असे असताना आणि #who ने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केले आहे. असे असताना आज महाराष्ट्रातील माता भगिनींना एका वेगळ्याच संकटाने ग्रासले आहे ते संकट म्हणजे #मायक्रो फायनान्स चे हप्ते कशे भरायचे, म्हणूनच बहुजन मुक्ती पार्टी ने राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे.
केंद्र सरकारने ज्यापद्धतीने मोठ - मोठ्या उद्योगपतींचे २८ हजार कोटींचे कर्ज माफ केले त्यापद्धतीने
या सामान्य वर्गातील महिलांचे कर्ज माफ करावे आणि
जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत फायनान्सची कर्ज वसुली थांबविण्यात यावी म्हणून उद्या दि २३ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . त्या आंदोलनाचे निवेदन वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे देण्यात आले आले.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे संतोष भिसे , भाऊसो हुंबरे , दीपक दणाने , विकास शेंडगे उपस्थित होते.



