सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मु. सा काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालययाचे माजी विध्यार्थी व दैनिक प्रभात चे पत्रकार, भारतीय पत्रकार संघ, बारामती चे उपाध्यक्ष विनोद गोलांडे हे उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी आपल्या शिक्षकां प्रती आदर व्यक्त करून गुरूंचे जीवनातील महत्व अधोरेखित केले. शिक्षक हा समाज परिवर्तनाचा मुख्य घटक असून उद्याचे सुज्ञ नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.आज माझ्या शिक्षकांमुळेच मी आज येथे उपस्थित आहे याचा मला अभिमान असल्याचे मतही त्यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थी दशेपासून ते एक जबाबदार शिक्षक हा तपशील वार प्रवास महाविद्यालयायचे उपप्राचार्य डॉ. जे. म. साळवे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी आजच्या काळातील शिक्षकांनापुढील आव्हाने व बदलती शिक्षण प्रणाली यावर आपले सविस्तर मत व्यक्त केले. आधुनिक काळात शिक्षकाची भूमिका केवळ शिक्षक म्हणून न राहता विद्यार्थ्यांचा पालक मार्गदर्शक व सल्लागार म्हणून असली पाहिजे असे मत त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथमेश झाडगे, अजिंक्य होनमाने व प्रतीक पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान केला. शिक्षक दिन समारंभाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.अच्युत शिंदे यांनी केले व कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.जे एल चौधरी, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. प्रविण ताटे देशमुख, डॉ. एस टी घाडगे, प्रा. नारायण राजुरवार, प्राध्यापक डॉ. अजय दरेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ. डी आर डुबल यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सोशल डिस्टन्स चे पालन करत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
********************************************