Type Here to Get Search Results !

प्रा. हमीद काझी यांना पुणे विद्यापीठाकडून पी.एच.डी. पदवी बहाल


इंदापूर प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

कळंब येथील इंदापूर तालुका  ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.हमीद उमरअली काझी यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी.एच.डी.ही पदवी जाहिर केली.त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शामराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली *भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहासःविशेष संदर्भ-प्रभात फिल्म कंपनी* या विषयावर संशोधन करून शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला होता . त्यांच्या या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी रणसिंग , खजिनदार  हणमंतराव(आबा) रणसिंग , विश्वस्त शिवाजीराव (तात्या) रणवरे , प्रकाश (बापू) कदम , 
वीरसिंह रणसिंग , महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अंकुशराव आहेर , माजी कार्यालय अधिक्षक शिवाजीराव कदम व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले . प्रा.काझी हे सन १९८४ पासून म्हणजे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयात इतिहास विषयाचे अध्यापन करीत असून एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक आहे.आदर्श शिक्षक म्हणून त्यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . त्यामध्ये उरळी कांचनच्या डाॅ.मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या *राष्ट्रसेवा पुरस्कार* तसेच पद्मश्री डाॅ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या *राष्ट्ररत्न* पुरस्काराचा समावेश आहे . त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test