Type Here to Get Search Results !

प्रतिबंधित पानमसाला असलेल्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा..


मिलन शाह मुंबई

प्रतिबंधित पानमसाला असलेल्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि . १५.१०.२०२० रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने द फॅल्ग कंपनी शेजारील मोकळ्या जागेवरील गोडावून , लोढाधाम जवळ , वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ता . वसई , जि . पालघर या गोदामावर छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखू या पदार्थांचा रु .२८,१ ९ , ७७२ / - किंमतीचा साठा हजर व्यक्ती श्रवण वैधनाथ साहनी याच्या ताब्यातून जप्त केला . सदर साठा इक्बाल व राजू नामक व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे समजले आहे . सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे . सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री ना . डॉ . राजेंद्र शिंगणे , राज्यमंत्री ना . राजेंद्र येड्रावकर व मा . आयुक्त श्री . अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त ( दक्षता ) श्री . सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री . आर.डी.मुंडे , श्री . एम.आर.महांगडे , श्री . डी.एस.साळुखे , श्री . डी.एस.महाले , श्री.बी.एन.चव्हाण , श्री . भांडवलकर , श्री . पी.पी.सूर्यवंशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली . चार दिवसांपूर्वीच दक्षता पथकाने महापे येथे तीन वाहनावर छापा टाकून विमल पान मसाला व व्ही -१ सुगंधित तंबाखू या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांचा रु . ३५ , ५३,३१२ / - किंमतीचा साठा जप्त केला होता . प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या गोदामाबाबत अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास त्याची माहिती टोल फ्री क्र .१८००२२२३६५ वर अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त ( दक्षता ) श्री . सुनील भारद्वाज यांनी जनतेला केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test