बारामती प्रतिनिधी
आज मौजे मानाजीनगर व धुमाळवाडी येथे" माझे कुटुंब माझी जबाबदारी "या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्याचे कोवीड संदर्भात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये मानाजी नगर येथे 31 संशयितांची एंटीजेन तपासणी केली असता त्यापैकी 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळूनआले तसेच धुमाळवाडी येथील 20 संशयितांची तपासणी केली असता त्यापैकी 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून पणदरे येथील 04 संशयितांची एंटीजेन तपासणी केली असता 02 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत असे एकूण 55 संशयित रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 17 रूग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामती ची एकूण रुग्ण संख्या 4014 झालेली असल्याची माहिती बारामती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.