इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
दर हेक्टरी च्या संदर्भात सरकारला एवढीच आठवण करून देतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मागच्या पावसाळ्यात जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी आता पूर्ण करावी . त्या वेळेस ते स्वतः आमच्यासोबत होते . आम्ही दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते . उद्धव ठाकरे यांनी सांगितले की हे पॅकेज अपूर्ण आहे , आणि सरकारने शेतकऱ्यांना स्वतः २५ ते ५० हजार रुपये दर हेक्टरी मदतीची मागणी केली त्यांनी केली होती . आमची मागणी काय असेल ते असेल पण जी मागणी त्यांनी स्वतः केली होती . ते आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी ती पाठीमागील मागणी आता पूर्ण करावी , अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.१९) येथे केली .
ना.देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्हाच्या दौऱ्यावरती आज होते . भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत भिगवण , भादलवाडी, सणसर , निमगाव केतकी भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली . त्यानंतर इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली.
यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , खा. रणजीत निंबाळकर ,आ. रणजित मोहिते पाटील , आ.राहुल कुल ,आ.राम सातपुते , माजी मंत्री बाळा भेगडे , भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते .
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने शेती , घराचे , दुकानाचे ऐतिहासिक तलावाचे नुकसान झाले असून त्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले असून मोठी हानी झाली आहे . या सामान्य नागरिकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी , यासाठी देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदन दिले .
फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची जी घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना आम्ही जो कोल्हापूर पॅटर्न दिला होता त्याप्रमाणे मदत झाली पाहिजे . ज्यामध्ये आम्ही जवळजवळ अडीच ते तीन लाखाची मदत केली होती . त्या पॅटर्नप्रमाणे ही मदत त्यांना मिळाली पाहिजे .पण मदत ही तत्काळ केली पाहिजे . दीड महिन्याने मदत करू , देऊ दोन महिन्यात मदत देऊ असे केले नाही पाहिजे . शेतकऱ्याला आता जे काय नुकसान झाले आहे त्याच्यामध्ये तात्काळ त्याला शेती मशागत करण्यासाठी पुढील रब्बी पिके घेता यावे यासाठी तात्काळ मदत मिळाली पाहिजे . अशी मदत मिळाली नाही तर शेतकरी पुढेदेखील उभा राहू शकणार नाही . शेतकरी आपल्या जवळचे सर्व पैसे शेतीसाठी लावत असतो. पीक आल्यानंतर त्याच्याकडे पैसे परत येतात मात्र आता पिकच वाहून गेले असेल किंवा झोपले असेल , जमीन अनेक ठिकाणी खरडून गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला तात्काळ मदत केली नाही तर तो उभा राहू शकणार नाही .
शंभर टक्के हे सरकार टोलवा टोलवी करत आहे . स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले आहे कि जी मदत पाहिजे ती आम्ही करू. पंतप्रधान स्वतः फोन करून सांगत आहेत मात्र येथे ज्यांची प्राथमिक जबाबदारी आहे . प्राथमिक जबाबदारी राज्याची आहे ते मात्र हात झटकून राहिले आहेत . ते इकडे तिकडे हात दाखवत राहिले आहेत . पहिले आपण काय करणार हे राज्यकर्ते यांनी सांगावे . केंद्र सरकार मदत देईलच , असे देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केले .
या पाहणी दौर्यामध्ये अनेक शेतकरी , कुटुंबातील महिला कर्त्या पुरुष सदस्यांनी झालेल्या नुकसानीच्या व्यथा विधिमंडळाच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्या पुढे मांडल्या . अनेकांना यावेळी गहिवरून आले होते. अश्रुंचे बांध फुटले होते . तत्काळ मदतीची भावना सर्वांनी व्यक्त केली .
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील,भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पाटील, तानाजीराव थोरात , भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, मारुतीराव वनवे, पराग जाधव , गजानन वाकसे आदी मान्यवर उपस्थित होते .