Type Here to Get Search Results !

सोमेश्वरला पाऊसाची रात्री अचानक सुरुवात...


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.. गेल्या आठ दिवसापासूनच प्रचंड वातावरणात उखाडा निर्माण झाला होता , त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी तसेच नागरिकांची लाहीलाही झाली होती .परंतु सुरू झालेल्या पावसामुळे वतावरणा बदलण्यास मदत झाली आहे. मात्र शेतात असलेल्या तरकारी पिकांचे थोडेफार नुकसान होणार आहे . तसेच उभ्या पिकांना पावसाचे पाणी मिळाल्याने ते टवटवीत होण्यास मदत होणार आहे. ऊस पिकाला कोणताही परिणाम होणार नाही , बाजरी पीक निघालेल्या शेतात पेरलेल्या मका, ज्वारी व इतर पिकांना पावसाचा चांगलाच फायदा होणार आहे.
सध्या ढगात चांगलीच काळोखी असल्याने व बदलत्या  वतावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test