पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ
वाल्हे ( ता.पुरंदर ) गावच्या हद्दीतील कामठवाडी जवळ करंजनाला व टिळेकर या नावाने ओळखल्या दोन्ही विद्युत रोहित्रातून अज्ञात चोरट्यांनी चक्क १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारांची चोरी करून पोबारा केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत वाल्हे पोलीस दूरक्षेत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१७ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कामठवाडी येथील करंजनाला ( डी.पी.कोड.क्र.४०५०७२८ ) व टिळेकर ( डी.पी.कोड क्र.०५०१०८० ) नावाच्या विद्युत रोहित्राचे फ्युज तोडून विद्युत पुरवठा खंडित केला.त्यानंतर विजेच्या खांबावरून दोन्ही रोहित्रे खाली पाडून त्यामधील अंदाजे ४०० लिटर आँईल जमिनीवर सोडून दिले.त्यानंतर दोन्ही रोहित्रातून एकत्रित अंदाजे ९० हजार किमतीच्या १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारांची चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला आहे .
या घटनेची फिर्याद अमोल संभाजी जाधव ( वय ४० रा.दौंडज ) यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वी. ४२७ ,कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार के.आर.जगताप हे करित आहेत.



