Type Here to Get Search Results !

पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूकनोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात-अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतला कामाचा अडावा..


 पुणे,दि.24: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यातअशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतलायावेळी ते बोलत होते. बैठकीला उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणालेआदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाहीयाची दक्षता घ्या. निवडणुक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांच्याबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. मतदान व मतमोजणी प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारीकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करा.  कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्या. मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करा. मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारीकर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर व आवश्यक साहित्य पुरवाअसे सांगून श्री. देशमुख म्हणालेनिवडणूक कामकाजातील अधिकारीकर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा.

             श्री. देशमुख म्हणालेमतदान व मतमोजणी कामासाठी योग्य नियोजन करा. निवडणूकीचे काम सुरळीत होण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थाखर्च व्यवस्थापनकर्मचारी व्यवस्थापन,  कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणवाहन अधिग्रहण व वाहतूक आराखडानिवडणूक साहित्य मागणी व वितरणमतदार यादी वितरणटपाली मतपत्रिकातक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष कामकाजस्वीप कार्यक्रममतदारांना सोयी सुविधांची अंमलबजावणीमतदार जनजागृती आदी विविध बाबींचा आढावा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतला.

 निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपसात समन्वय साधून काम करावेअसे सांगून उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांचा आढावा घेतला.

  नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदारी व केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test