Type Here to Get Search Results !

कुलवंत वाणी समाज ट्रस्ट च्या वतीने सृजन मातीचे किल्ले व दिपोत्सव(दिवे सजावट) ऑनलाईन प्रदर्शनात कलाप्रेमींचा उत्स्फूर्तपणे सहभाग




विशेष प्रतिनिधी

कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या वतीने दि.२३ व २४ नोव्हेंबर २०२० रोजी सृजन मातीचे किल्ले व दिपोत्सव(दिवे सजावट) ऑनलाईन प्रदर्शनाचे आयोजन भारतीय संस्कृतीचे व पूर्वजांच्या इतिहासाचे जतन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले.
         या अंतर्गत कलाप्रेमी यांना सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी दि.८ नोव्हेबर ते १७ नोव्हेबर २०२० असा एकूण १० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.या कालावधी मध्ये कलाप्रेमी यांनी स्वतःच्या घराच्या परिसरात अतिशय सुंदर,मनमोहक,
विलोभनीय,आकर्षक,मातीचे किल्ले व दिवे सजावट यांची निर्मिती करून त्यांचे फोटो ऑनलाईनरित्या सादर केले.सदर प्रदर्शनामध्ये मध्ये दहा दिवसात  उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र राज्यांच्या विविध भागातून  एकूण "१५६" कलप्रेमींनी ऑनलाईन सहभाग घेतला
          सहभागी कलाप्रेमी यांच्या गणपती सजावट व गौरी सजावट याचे ऑनलाईन प्रदर्शन अनुक्रमे  दि.२३ व २४ नोव्हेबर २०२० या दिवशी फेसबुक,व्हाट्सएप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले.
       सहभागी कलाप्रेमी यांची स्वतंत्र यादी व्हाट्सएप ग्रुप व फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध करून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच सदर प्रदर्शनातील सर्व सहभागी कलप्रेमींना आकर्षक ऑनलाइन डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ट्रस्टच्या वतीने  देण्यात येणार आहे.
           दिपावली महोत्सव २०२० या उपक्रमामुळे समाजातील कलाप्रेमींना आपल्यातील सुप्त कलागुणांना सर्वांसमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली.या उपक्रमाचे समाजात प्रथमच आयोजन करण्यात आले असून याचे संपूर्ण नियोजन कुलवंत वाणी समाजातील सर्व समन्वयक यांनी केले होते.या उपक्रमात बहुसंख्य शालेय विद्यार्थी, समाजबांधव भगिनी यांनी सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे आयोजन दिपावली उत्सवाच्या कालावधीत केल्यामुळे सर्व समाजबांधव,महिला भगिनी व शालेय विद्यार्थी यांना आनंद लुटण्याचा जणू दुग्ध शर्करा योग लाभला.या उपक्रमाबाबत समाजात सर्वत्र स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.
       अशी माहिती कुलवंत वाणी समाज ट्रस्टचे समन्वयक.अमोल सिद्ध,.मुकुंद भसाळे, मंदार वासकर व प्रविण शेटे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test