Type Here to Get Search Results !

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा ४७ वा वाढदिवस अविश्री बालसदन (अनाथाश्रम ) कुरकुंभ येथे साजरा.

दौंड प्रतिनिधी राहुल  आवचर 

दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा ४७ वा वाढदिवस अविश्री बालसदन (अनाथाश्रम ) कुरकुंभ येथे  येथे साजरा केला. 
यावेळी अविश्री बालसदन (अनाथाश्रम ) येथे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करून त्या मुलांना अनाथ नसल्याचं भासवून दिलं तसेच त्या मुलांना जेवणाचा आस्वाद दिला. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले की मी ज्या पोलीस स्टेशन ला कार्यरत असेल त्या हद्दीत असणाऱ्या गरीब व अनाथ (आश्रममधल्या)  मुलांसोबत मी वाढदिवस साजरा करत असतो.  तसेच जिथे कमी तिथे आम्ही असं असावं ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी पोलीस असतात  असे यावेळी पवार यांनी व्यक्त केले. यावेळी अनाथ मुलांनी तसेच अविश्री बालसदनचे  संस्थापक अध्यक्ष अनिल कटारिया , पांढरेवाडी चे उद्योजक एस.पी. शितोळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे, दौंड पोलीस कर्मचारी यांनी यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test