Type Here to Get Search Results !

श्री सोमेश्वरच्या चेअरमन यांनी तात्काळ एकरक्कमी FRP द्यावी : सतिश काकडे



सोमेश्वरनगर प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू होवुन ३० दिवस झालेले आहेत. आज दि. २५/११/२०२० अखेर पर्यंत कारखान्याने १,५८,००० मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. कायद्या प्रमाणे गाळप झालेल्या उसाला १४ दिवसात F.R.P रक्कम देणे बंधनकारक आहे. अन्यथा सदर रक्कमेवर १५ टक्के व्याज द्यावे लागते. तरी चेअरमन यांना आवाहन करण्यात येते की, ज्या सभासदांचे उस गाळपासआलेले आहेत त्यांच्या बँक खात्यावर एक आठवड्यात तात्काळ F.R.P रक्कम वर्ग करावी. तरी कारखान्याने F.R.P रक्कम सभासदांच्या बँक खात्यात वर्ग न केल्यास वेळ प्रसंगी शेतकरी कृती समितीच्या वतीने काटा बंद किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल व F.R.P रक्कम उशिरा दिल्याने त्यावर व्याजाची मागणीही करण्यात येईल. त्यावेळी काही अनुचीत प्रकार घडल्यास त्यास चेअरमन,कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी. चेअरमन कायम कारखान्याची तुलना राज्यातील आघाडीच्या कारखान्यांबरोबर करतात मग कारखान्याने F.R.P एकरक्कमी अजुन पर्यंत
सभासदांच्या बँक खात्यात वर्ग का केली नाही.
तसेच गेल्या आठवड्यात विस्तारीकरण करणे बाबत शेतकरी कृती समितीने वर्तमान पत्राव्दारे
काही मुद्दे उपस्थित केले होते तसेच याबाबत कारखान्यास निवेदन व लेखी पत्र ही दिलेले आहे. तरी आज ५ दिवस झाले तरी देखील कारखान्याने याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. तरी चेअरमन व संचालक मंडळ यांना विनंती करण्यात येते की, कारखान्याला विस्तारीकरणाबाबत मा.साखर आयुक्त कार्यालयाची मंजुरी मिळो अथवा न मिळो कारखान्याने कारखाना कार्यक्षेत्रातील जेष्ठ व अभ्यासु सभासद, संचालक मंडळ, VSI चे अधिकारी तसेच कृती समिती यांच्या बरोबर विस्तारवाढी व इतर बाबीं संबंधी तात्काळ मिटींग घेवुन विस्तारीकरणाबाबत व इतर बाबींसंबंधी सभासदांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचा चेअरमन यांना खुलासा करता येईल व नंतरच विस्तारवाढी संबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा. तसेच विस्तारवाढी संबंधी चेअरमन जर मिटींग बोलवत नसतील तर सोमेश्वर कारखान्याची निवडणुक जवळ आल्याने विस्तारीकरणा संबंधी मिटींग बोलविल्यास सभासदांच्या रोषाला सामोरे जाण्याची चेअरमन यांना भिती वाटत आहे का? कारखान्याच्या विस्तारीकरणा संबंधी मी कारखान्याला व मा.ना.अजित पवार यांना लेखी पत्र दिलेले आहेत त्यासंबंधीचे खुलासे अद्यापपर्यंत
केलेले नाहीत.तरी चेअरमन व संचालक मंडळाने विस्तारीकरण व अनेक बाबींवर मिटींग घेवुन जर समाधानकारक खुलासे केले तर सभासद व कृती समिती विस्तारीकरण व इतर बाबींबाबत सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी तात्काळ मिटींग बोलविण्याचे आवाहन चेअरमन व संचालक मंडळास करीत आहे. भविष्यात कारखाना अडचणीत येवु नये व जर कारखाना अडचणीत आला तर सभासद अडचणीत जाईल, तरी सर्वांनी राजकिय जोडे बाजुला ठेवुन सर्व सभासदांच्या प्रपंचाचा विषय असल्याने चेअरमन व
संचालक मंडळाने सकारात्मक पाऊल उचलुन योग्य तो निर्णय घ्यावा. मी पणा न करता सभासदांचे हित
जोपासावे. चेअरमन यांनी विषयांतर करून हा राजकिय मुद्दा करू नये. विस्तारीकरणासह इतर बाबींवरचर्चा करावी. तसेच मी कारखान्यांस ज्या माहित्या मागितलेल्या आहेत त्या देखील तात्काळ देण्याचे नियोजन करावे. तरी कारखान्याने F.R.P रक्कम सभासदांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करून विस्तारवाढ व इतर बाबींवर तात्काळ खुली चर्चा करण्याचे आवाहन कृती समितीव्दारे करण्यात येत आहे.सदर निवेदना विषयी सकारात्मक निर्णय न घेतल्यास चेअरमन व संचालक मंडळ हेकेखोरपणे वागल्यास व भविष्यात कारखाना अडचणीत गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळावर राहील.
**************************************
मी या निवेदनाव्दारे जाहिर खुलासा करतो की चेअरमन यांना हा कोणताही राजकिय स्टंट वाटत असेल तर सन २०२०-२१ च्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी पॅनेल सुध्दा टाकणार नाही, कारण मी कारखान्याचा संस्थापक सभासद असुन संस्थापक कुटुंबातील आहे. भविष्यात
कारखाना टिकला पाहिजे हा माझा व कृती समितीचा आग्रह असुन मला कारखानाचे व कारखान्याच्या सभासदांचे हित महत्वाचे आहे निवडणुक महत्वाची नाही. यात कोणताही राजकिय स्टंट नाही. मी जे बोलतो तेच करीत आलेलो आहे तुमच्या सारखी भुमिका बदलत नाही.

...सतिश काकडे अध्यक्ष पुणे जिल्हा कृती समिती...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test