दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
दौंड तालुक्यातील साधारपणे ८० ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार आहे त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी येत्या ८ डिसेंबरला मंगळवारी सरपंच पदासाठी आरक्षण सोडतअसून दौंड येथे होणार आहे .तहसिल कार्यालयाकडून देण्यात आलेले पत्र असे म्हटले आहे की तालुक्यातील ८० ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दिनांक ८ रोजी मंगलमूर्ती खुले सभागृहातील एसआरपीएफ ग्रुप नंबर पाच येथे सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ठेवण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे 'गावपातळीवर अत्यंत प्रतिष्ठेची असणारी ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गावपुढारी तयारीला लागले आहेत. मात्र, अजून सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली नाही. गावात सरपंच पदासाठी काय आरक्षण निघते? यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. त्यामुळे सरपंच पदाची आरक्षण सोडत महत्वाची आहे