Type Here to Get Search Results !

खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला पदवीधर मतदानाचा पहिला हक्क


बारामती प्रतिनिधी : 

बारामतीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला झाली सुरुवात खासदार सुप्रिया सुळेंनी बजावला पहिला मतदानाचा हक्क

बारामतीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एमईएस हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. प्रशासनाने कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन थर्मल स्क्रीनिंग सॅनिटायझर आणि ऑक्सी मीटरचा वापर केला आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडी आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये खरी लढत मानली जात आहे.महा विकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यात ही प्रमुख लढत मानली जात आहे. याशिवाय जवळपास ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


राज्यात महाविकास आघाडीचे आघाडीचे सरकार आल्यापासून वातावरण स्वच्छ झालं आहे.. निवडणूक ही प्रतिष्ठेची नसून पदवीधर आणि बेरोजगारीचे प्रश्न संवेदनशील पणे मांडण्यासाठी ही निवडणूक आहे, असं मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा बद्दल बोलताना सुळे म्हणाल्या महाराष्ट्रात त्यांचे स्वागतच आहे.आम्ही खोट्या मनाची माणसं नाहीत,बॉलिवूड आणि मुंबईचं नातं हे दुधात साखर असल्यासारखा आहे.केंद्र सरकारने मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. भाजपची संघटना स्थिर ठेवण्यासाठी त्यांच्या नेतेमंडळींना सरकार पडणार असल्याचे बोलावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test