आरोपीला चार दिवसांची पोलीस कस्टडी
इंदापूर प्रतिनिधी आदित्य बोराटे.
इंदापूर शहर पोलीस स्टेशनच्या रात्रपाळी गस्ती पथकाकडुन इंदापुर-बारामती बायपास चौकामध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना रात्री होंन्डा आक्टीव्हा स्कुटी गाडीवरून प्रवास करणार्या इसमाच्या स्कुटी गाडीची पोलीसांनी तपासणी केली असता गाडीच्या डीक्कीत अर्धा किलो वजनाचा व दहा हजार रूपये किमंतीचा अमंली पदार्थ गांजा आढळुन आला असुन सदर प्रकरणी आदर्श चंद्रकांत सागळे.रा.मंगळवार पेठ, भोर,ता.भोर, जि.पूणे. याचेवर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली.
याबाबतची फिर्याद पोलीस काँस्टेबल संजय बबन कोठावळे यांनी इंदापूर पोलीसात दाखल केली असुन फिर्यादीत म्हटले आहे की बुधवार दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री दोन वा.चे. सुमारास इंदापूर- बारामती बायपास चौकात नाईट राउंड नाकाबंदी वाहन तपासणी सुरू असताना समोरून एक दुचाकी मोटारसायकल क्र.एम.एच.१२, एस.टी. ८५५१ येताना दीसली.सदर दुचाकीस्वारास थांबवुन त्याचेसह त्याचे दुचाकीची तपासणी केली असता गाडीच्या डीक्कीत पांढर्या रंगाच्या पिशवित ५०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळुन आला. त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दीली.परंतु नंतर सदर गांजा हा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगीतले.
इंदापूर पोलीसांनी सदर इसमाला गाडी व ५०० ग्रॅम अमली पदार्थ गांजा मालासह ताब्यात घेवुन त्याचेवरती अमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असुन बुधवार दिनांक २ डिसेंबर रोजी त्याला इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता आरोपीला चार दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दीले असुन पुढील तपास इंदापूर सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित जाधव हे करत आहेत.